नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसकडून आणखी दोघांना अटक
वासुदेवने इतर आरोपींना राज्यात फिरायला आणि रेकी करायला वाहन पुरवल्याचा संशय एटीएसला आहे.
मुंबई: नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखीन दोन आरोपींना एटीएसने अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय उर्फ भय्या लोधी अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे जळगावच्या सकलीचे रहाणारे आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांचा आकडा सातवर पोहोचला आहे.
वासुदेवने इतर आरोपींना राज्यात फिरायला आणि रेकी करायला वाहन पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या गाड्यादेखील वासूदेवने पुरवल्याची शक्यता आहे. या दोघांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.