भांडूपमध्ये विद्यार्थ्याचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ
मुंबई : भांडुपमध्ये एक महविद्यालयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. भांडूपच्या रामकली विद्यालयातल्या सुशील वर्मा असं तरुणाचं नाव आहे. सुशील वर्माला वर्गातून बाहेर बोलावण्यात आलं. मारेकऱ्यांनी सुशीलला वर्गाबाहेर बोलावून जीवघेणा हल्ला केला. सुशील वर्माहा सायन्सचं शिक्षण घेत होता. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक इसम कॉलेजमध्ये आला आणि त्याला बाहेर घेऊन गेला. 3 जणांनी या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.
नागरिकांनी जखमी अवस्थेत या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भांडूप पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे. पण अशा घटनांनी पुन्हा पुन्हा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.