दादरच्या स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल
दिवसरात्र गजबजलेल्या असणाऱ्या दादर स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मृतदेह `स्काय वॉक`ला लटकताना दिसत आहे. या लटकणाऱ्या मृतदेहाबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.
मुंबई : दिवसरात्र गजबजलेल्या असणाऱ्या दादर स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मृतदेह 'स्काय वॉक'ला लटकताना दिसत आहे. या लटकणाऱ्या मृतदेहाबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.
कर्जबाजारी
साधारण ४ दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचे बोलले जाते. 'मुंबई लाईव्ह'ने दिलेल्या वृत्तानुसार महावीर गोसावी असे या तरुणाचे नाव असून तो औरंगाबादच्या केळगावचा राहणारा आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केल्याचे सुत्रांनी सांगितले.
टेलरींगचा व्यवसाय
गेल्या ४ वर्षांपासून तो मानमाडच्या खासगाव येथे पत्नी आणि २ मुलांसह भाड्याने राहत होता. व्यवसायाने टेलर असलेल्या महावीरच्या डोक्यावर मोठे कर्ज होते.
याची परतफेड न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
'शिवाजी पार्क' स्थानक पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.