ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट लीनं मुंबईत या मंडळाच्या बाप्पाचे घेतले दर्शन
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली याने मुंबईतील सर्वाधिक खर्च करणारं मंडळ अशी ख्याती असलेल्या जीएसबी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन ब्रेट बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली याने मुंबईतील सर्वाधिक खर्च करणारं मंडळ अशी ख्याती असलेल्या जीएसबी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन ब्रेट बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला.
यंदा जीएसबी मंडळाच्या मंडपाचंच बजेट २६४.७५ कोटी रुपये आहे. गणरायाची मूर्ती शुद्ध सोन्याच्या अलंकारांनी सजवण्यात आली आहे. यंदाच्या सजावटीसाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आलाय. भक्तांना प्रसादही बटर पेपरमध्ये दिला जातोय. जीएसबीच्या गणरायाचं पाचव्या दिवशी विसर्जन केलं जातं.