Kurla Railway Station: मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होत असतात. काही अपघाताचे व्हिडीओ तुफान व्हायरल देखील होतात. अशातच आता मुंबईत रिक्षाचालकाची (auto rickshaw) मुजोरी पहायला मिळाली... रस्त्यावर नव्हे तर थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर... पठ्ठ्यानं थेट रिक्षा प्लॅटफॉर्मवर (kurla railway station) चढवली. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 12 ऑक्टोबरची असल्याचं समजतंय. परंतु या व्हिडिओबद्दलची माहिती समोर आली, जेव्हा एका नेटकऱ्याने ट्विट करत व्हिडीओ शेअर केला. रेल्वे मंत्रालय आणि आरपीएफने देखील यावर स्पष्टीकरण दिलंय. ही घटना नेमकी कधी झाली आणि कशामुळे झाली यावर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकावर कारवाई देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


आणखी वाचा - Video : भाषणादरम्यान बोलणाऱ्या कार्यकर्त्याला मंत्र्याने फेकून मारला माईक


12 ऑक्टोबर रोजी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या म्हणजेच कल्याण इन्ड ब्रिजच्या वेस्ट साईडवरून ही रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवर पोहोचली. त्यावेळी आरपीएफ जवानांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांनी देखील आरडाओरड केली. त्यानंतर रिक्षा निघून गेली. काही वेळानंतर रिक्षाचालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं.


पाहा व्हिडीओ - 


 



दरम्यान, रिक्षा देखील पोलिसांनी ताब्यात (driver arrested) घेतलं असून आरोपीला सीएसएसटी न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. आम्ही हे प्रकरण गांभिर्याने घेतलंय, असं आरपीएफने स्पष्ट देखील केलं आहे.