नवी मुंबईत रिक्षाचालकाची मुजोरी
नवी मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीची घटना समोर आली आहे. भररस्त्यात नवी मुंबई पालिकेच्या बसचालकाला रिक्षाचालकानं बेदम मारहाण केली.
घणसोली : नवी मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीची घटना समोर आली आहे. भररस्त्यात नवी मुंबई पालिकेच्या बसचालकाला रिक्षाचालकानं बेदम मारहाण केली.
घणसोली रेल्वे स्थानका समोरची ही घटना आहे. ट्रॅफिकच्या वादातून ही मारहाण करण्यात आली.
फैय्याज अंजिम पठाण असं मारहाण झालेल्या बसचालकाचं नाव आहे. या प्रकरणी दोघा जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.