मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी अनिल तटकरे यांनीही शिवबंधन बांधले. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे. अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण ही सदीच्छा भेट असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पण आज शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्यावर कोणती जबाबदारी असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळ प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेवर बोलण्याऐवजी ओवेसींसोबत बोलावे असे टोला लगावला. 


राज्यात सध्या सुरु असलेल्या गडकिल्ल्ल्यांच्या मुद्द्यावरही उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रांच्या गडकिल्ल्यांबद्दल कोणी वेडेवाकडे बोलत असेल तर शिवसेना खपवून घेणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.