मुंबई : सरकार अंतरिम निर्णयाच्या वेगैरे अफवा फसरवीत असले तरी, आपण आंदोलनावर ठाम राहायचं असं म्हणत रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांचा विश्वास वाढवला. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटीच्या आंदोलकांसोबत ते संवाद साधत होते. परंतू यावेळी खोत यांना मोठ्या संख्येने भेटणाऱ्या आंदोलकांसमोर त्यांना अश्रुचा बांध फुटला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाभाऊ खोत आणि भाजपनेते गोपिचंद पडळकर यांनी एसटी कामगाराच्या संपाला पाठिंबा दिला असून ते स्वतः आंदोलनात उपस्थित आहेत. 


काही जणांनी पसरवलेल्या खोट्या मॅसेजमुळे आपल्यावर विश्वास नसेल तर आपण आंदोलनातून बाहेर पडू असे खोत यांनी म्हटले. त्यावेळी खोत आझाद मैदान सोडण्याच्या तयारीत होते. कामगारांनी आपला पडळकर आणि खोत यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत. त्यांना मैदानात रोखले.


आज आंदोलनाच्या 15 व्या दिवशी खोत आणि पडळकर यांनी संपकरी कामगारांशी संवाद साधताना, संपकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत असताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले.