मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतल्या परेलमधील ज्या बीआयटी चाळीमध्ये आपल्या आयुष्यातील २२ वर्षांचा कालखंड घालवला. त्याजागी आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. या वास्तूंमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्या जागी आता राष्ट्रीय स्मारक करून तिथल्या स्थानिकांचे पूनर्वसन करण्यात येणार आहे. गृहनिर्माण खातं याबाबत निर्णय घेणार असून आजच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या चिराग नगर इथे येत्या वर्षभरात स्मारक पूर्ण कऱण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे.


बीआयटी चाळीतील खोली क्रमांक ५० आणि ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटुंबीय १९१२ ते १९३४ गरम्यान राहत होते. अनुयायांसाठी या वास्तूचे खूप महत्त्व आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनेक जण या वास्तूला आवर्जून भेट देतात.