मुंबई : महिलेने उडत्या विमानात बाळाला जन्म दिला, जेट एअरवेजच्या विमानाने ही महिला प्रवास करत होती. दमाम (सौदी) ते कोची असा प्रवास करताना, या महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागताच विमानातील कर्मचाऱ्यांनी आणीबाणी घोषित करत विमान तातडीने, जवळ असलेल्या मुंबई विमानतळाकडे घेण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू होताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू करत काही मदत करता येते का हा प्रयत्न सुरू केला.  मात्र केरळ राज्यातील एक नर्स याच विमानातून प्रवास करत होती. ती पुढे आणि आणि या महिलेच्या मदतीने विमानातील महिला कर्मचाऱ्यांनी विमानातच या महिलेची प्रसूती पार पाडली. या महिलेने विमानात गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि मुल दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे विमान कर्मचाऱ्यांनी सांगितले.


विमानात कोणीही डॉक्टर नव्हता. विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी मुंबई विमानतळावर डॉक्टर उपलब्ध होऊ शकतात का यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र यात त्याना यश मिळू शकले नाही. जेट एअरवेजचे हे विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने आई आण बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. विमान पुन्हा आपल्या कोची प्रवासाकडे निघाले.