बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात `मिर्झापूर सीरिजमध्ये...`
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.
Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपी शाळेतच काम करणारा सफाई कर्मचारी होता. आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत संतप्त बदलापूरकरांनी तब्बल 9 तासांचा रेल रोको केला होता. मात्र आरोपी आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर होता. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट करण्यात येत आहेत.
बदला पुरा, मुंबईत पोस्टर
बदलापूरप्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत हातात बंदूक असलेले पोस्टर (Devendra Fadanvis Poster) झळकली आहेत. मुंबईत काही ठिकाणी 'बदला पुरा' असं लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून त्यांच्या हातात बंदूक दाखवण्यात आली आहे. यावरुन खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे, जी मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय, अशी टीका खासदार सु्प्रिया सुळे यांनी केली आहे. मिर्झापूर टिव्ही सिरिज मध्येच या गोष्टी चालतात. बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही अथून देवेंद्रजींना संविधान दाखवू असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईत आणखी एक बॅनर लावण्यात आला असून या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचा फोटो झळकावण्यात आला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळेल असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय..
हायकोर्टात एनकाऊंटवर प्रश्नचिन्ह
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थीत केलाय. सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर होऊच शकत नाही असं म्हटलंय. दरम्यान याप्रकरणी आजची सुनावणी संपली असुन पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होमार आहे. यावेळी एन्काऊंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत..