मुंबई : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर तसंच वाहतूक बेटावर महानगरपालिकेच्या ए विभागाच्या वतीने कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे शिवसेनाप्रमुखांचा पुतळा आणि वाहतूक बेटासह फोर्ट परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं आणि विद्युत रोषणाईची पाहणी केली. एलईडी दिव्यांच्या झोतात उजळून निघालेला पुतळा, वाहतूक बेट पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. 


शिवसेनाप्रमुखांचा पुतळा आणि वाहतूक बेटावर विद्युत रोषणाई करण्यासाठी 50 वॅटच्या फ्लड लाईटसह 24 वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.