Balasaheb Thakre and Raj Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती (Shiv Sena chief Balasaheb Thackeray birth anniversary) दिवशी अनोखे नाटक रंगभूमीवर येणार आहे. बाळासाहेबांचा राज (Balasahebancha Raj) असे या नाटकाचे नाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray)यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे हे नाटक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीला बाळासाहेबांचा राज नावाच्या नाटकाचा रंगभूमी पहिला प्रयोग होणार आहे. अनिकेत बंदरकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.  तर, मनसे नेते अमेय खोपकर, बाळा नांदगावकर, राजू पाटील, अविनाश जाधव यांनी या नाटकासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 23 जानेवारीला प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. या नाटकात बाळासाहेबांची आणि भूमिका कोण साकारणार. या नाटकांत नेमकं काय दाखवलं जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. 


बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येत्या २३ जानेवारीला त्यांचं तैलचित्र मुंबई विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावलं जाणार आहे.  या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, राज  ठाकरे यांच्यासह तमाम ठाकरे कुटुंबीयांना तसंच अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनाही खास निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.


बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 23 जानेवारीला शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि दैनिक सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यावेळी कोणता संदेश देतात आणि कोणती राजकीय भूमिका मांडतात याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यानं मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केलाय. राज्यभरातून लाखो शिवसैनिक या मेळाव्यासाठी जमतील असं नियोजन करण्यात आलं आहे.