न्यायाधीश लोया यांच्या गूढ मृत्यूचं प्रकरण गंभीर - सर्वोच्च न्यायालय
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा गूढ मृत्यू ही गंभीर बाब असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे.
मुंबई : सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा गूढ मृत्यू ही गंभीर बाब असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे.
तसंच या प्रकरणातले सर्व कागदपत्रं सोमवापर्यंत सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सोहराबुद्दीन शेखच्या एनकाऊंटरप्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआयचे न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे.
मुंबई हायकोर्टात याप्रकरणाची सुनावणी सुरू असल्यामुळे सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी न करण्य़ाची विनंती करण्यात आलीय. मात्र सोहराबुद्दीन एनकाऊंटर प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा सहभाग असल्याचा आरोप करत राज्यातील पत्रकार बंधुराज लोणे यांनी केलाय. त्यामुळं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी लोने यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.