मुंबई : मुंबईकरांना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी..... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत जंगी होणार आहे. कारण पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू राहण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. हा आनंद लुटण्यासाठी 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.  या निर्णयानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसंच  या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 


असं असणार सेलिब्रेशन ? 


नवीन वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे थर्टीफर्स्टच्या जल्लोषासाठी मोठ-मोठ्या हॅाटेलपासून ते ढाब्यापर्यंत सर्वत्र लगबग सुरू आहे. मद्यप्रेमींनीही आतापासूनच पार्टीचं आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईही थर्टीफर्स्टचा जल्लोष साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते.  


मुंबईत ख्रिसमस नंतर उत्साहाला सुरूवात होते. आणि यंदा ख्रिमसचे सेलिब्रेशन हे शुक्रवार 22 तारखेपासूनच सुरू होणार आहे. 23, 24 आणि 25 असा लाँग विकेंड असल्यामुळे उत्साहाला उधाण आलं आहे. आणि असंच काहीस वातावारण हे नवीन वर्षाच्या स्वागताला असणार आहे. 30 आणि 31 ला शनिवार - रविवार असल्यामुळे सगळ्यांचे प्लान सेट होत आहेत. 30 डिसेंबर हा पाचवा शनिवार असल्यामुळे या दिवशी अनेक कार्यलये सुरू राहणार आहेत. पण तरिही नागरिकांमध्ये उत्साह कायम आहे.