मुंबई : मुंबई विद्यापीठाचा बहुप्रतीक्षित बी.कॉम परीक्षेचा निकाल अखेर लागलाय. मात्र निकाल लागला तरी तो विद्यार्थ्यांना काही पाहता येईना असंच चित्र सध्या निर्माण झालंय. कारण मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये इंटरनेट सेवा ठप्प झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब-याच घोळानंतर मुंबई विद्यापीठाकडून 27 ऑगस्टच्या मुहूर्तावर रात्री उशिरा बीकॉमचा निकाल जाहीर केला. मात्र सकाळी विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहण्याचा प्रयत्न करु लागले. 


मात्र ते पाहण्यात त्यांना अडचण येत असल्याचं समोर आलं. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे निकाल निकाल वेबसाईटवर अपलोड झालेला नाही. 


बी.कॉमच्या निकालाची उत्तीर्णता 65.56 टक्के इतकी आहे. टी.वाय.बी.कॉमच्या सेमिस्टर सहामध्ये 43 हजार 265 विद्यार्थी विविध श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालेत. 


मात्र कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हे विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान इंटरनेट दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.