बदल्यांच्या भानगडीत पडू नका, प्रलोभनांपासून दूर राहा; शरद पवारांचा मंत्र्यांना सल्ला
आणखी दहा वर्षे सत्ता कशी टिकेल या दृष्टीने विचार करा.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आगामी वाटचालीसाठी कानमंत्र दिला. बदल्यांच्या भानगडीत पडू नका, प्रलोभनांपासून दूर राहा, असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले. तसेच आता आपण सत्तेत आलो आहोत तर लोकांची कामे करा. आणखी दहा वर्षे सत्ता कशी टिकेल या दृष्टीने विचार करा, असा सल्लाही पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिला.
पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरेंकडे मुंबई उपनगर, दादांकडे पुण्याचा कारभार
खातेवाटप झाल्यानंतर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची ही बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. काम करताना पक्षाला कमीपणा येईल, असे होऊन देऊ नका. लोकाभिमुख कामे झाली पाहिजेत. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहिला पाहिजे. काम करताना भेदभाव न करता सगळ्यांची कामे करा. केवळ पक्ष नव्हे तर सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून काम करा, असे अजितदादांनी मंत्र्यांना सांगितले. तसेच मंत्री व राज्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने काम करावे, मंत्रालयात किती दिवस हजर राहायचे, मतदारसंघात कधी जायचे, याबाबतही अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
...तर लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करणार- नवाब मलिक
तसेच बैठकीत प्रशासकीय यंत्रणा, मंत्रालयीन कामकाज आणि पक्षवाढीविषयीही चर्चा करण्यात आली. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर आपआपल्या जिल्ह्यात सर्व पालकमंत्र्यांनी काय काय काम केले पाहिजे, याची जंत्रीही या मंत्र्यांना देण्यात आली.