मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात आज दुर्दैवी मृत्यू झाला. मर्सिडिज कारने ते प्रवास करत होते. या गाडीत 7 एअर बॅग्ज असताना ही त्यांचा मृत्यू झाला. कारण प्रवास करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री हे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. जे दोन लोक वाचले ते समोरच्या सीटवर सीट बेल्ट लावून बसले होते. या गाडीतून चार जण प्रवास करत होते, त्यापैकी मिस्त्री यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.


महिला डॉक्टर अनहिता पंडोले या गाडी चालवत होत्या. ते या अपघातात जखमी झाल्या आहेत.  जेएम फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॅरियस पांडोले हे देखील जखमी आहेत.


सीट बेल्ट लावला नसेल तर एअरबॅगचा उपयोग होत नाही. कारण सीट बेल्ट ही सुरक्षेची पहिली पायरी आहे. तर एअर बॅग ही संरक्षणाची दुसरी पायरी आहे. तुम्ही बसलेल्या सीटचा सीट बेल्ट जर व्यवस्थित लॉक केला नसेल तर एअर बॅग उघडणार नाही


सरकारच्या नियमानुसार सर्व गाड्यांमध्ये मागील सीटला सीट बेल्ट असतात, परंतु फार कमी लोक त्यांचा वापर करतात, हा एक भ्रम आहे की मागील भाग खूप सुरक्षित आहे.


अपघाताच्या वेळी पाठीमागील व्यक्तीला कधीकधी 40G (गुरुत्वाकर्षणाच्या 40 पट, म्हणजे 80kgs वजन असलेल्या व्यक्तीचे वजन 3200kg होते) वेगाने फेकले जाते.


जर समोरच्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला असेल आणि मागचा प्रवासीने लावला नसेल तर, अपघाताच्या वेळी समोरचा बसलेल्या व्यक्तीवर मागचा व्यक्ती हत्तीच्या वजना प्रमाणे फेकला होता. ज्यामुळे समोरचा प्रवासीही गंभीर जखमी किंवा ठार होण्याची शक्यता असते.