मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
सर्व कर्मचा-यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पालिकेला अल्टिमेटम दिलं आहे. वेतनाचा प्रश्न ६ ऑगस्टपर्यंत निकाली काढा, अन्यथा ७ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कृती समितीनं दिला आहे.
बेस्ट कृती समिती बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. या शिवाय गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले बेमुदत उपोषण बेस्ट संयुक्त कामगार समितीच्या नेत्यांनी सोडलं आहे.
सर्व कर्मचा-यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.