मुंबई : Electric Buses News : इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव बेस्टने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून इलेक्ट्रिक बससाठीचे अनुदान मिळत नसल्याने बेस्टने 1200 इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून निधी मिळणार होता. मात्र, काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता केंद्राकडून मिळणाऱ्या निधीची वाट न पाहता राज्य सराकारकडून मिळणाऱ्या निधीतून डबलडेकर इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासन घेणार आहे. 



केंद्रातील अवजड उद्योग मंत्रालय बेस्ट प्रशासनाला प्रत्येक बसमागे 36 लाख रूपयांचे अनुदान देणार होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून केंद्राकडून अनुदानाबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर काल बेस्ट समितीने इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा प्रस्ताव रद्द केला.