मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं सलग सातव्या दिवशी मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्यांना वेठीला धरू नका, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारलं. 'तुम्हाला काही करायचं नाही, चर्चेसाठी तुम्हाला व्यासपीठही नकोय' अशा शब्दांत न्यायलयानं संपकरी कर्मचाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. बेस्ट प्रशासन चर्चा करायला तयार आहे पण संपाच्या नावानं आम्हाला धमकावणं चुकीचं असल्याचं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे. तर मुंबई महापालिकेकडे पैसे असूनदेखील आम्हाला कुठलीही ऑफर देत नसल्याचं कर्मचाऱ्यांनी न्यायालयासमोर म्हटलंय. 


दरम्यान मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. त्यात कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे संपाच्या सातव्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.