... तरच संप मागे - बेस्ट कृती समिती, संपकऱ्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा
तोडगा निघाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार बेस्ट कृती समितीने केला आहे. त्याचवेळी रिक्षाचलकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळली आहेत.
मुंबई : तोडगा निघाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार बेस्ट कृती समितीने केला आहे. त्याचवेळी प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कामगारांनी शिवबंधन तोडले आहे. संपामुळे मुंबईकरांचे हाल झालेत. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना बसला आहे. या संपामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो सेवेचा ताण वाढला. सलग दुसऱ्या दिवशी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली दिसून आली. पूर्व मुंबई उपनगरातल्या घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची अक्षरशः गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. तर बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचलकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळली आहेत. प्रवाशांना भाड्यासाठी रिक्षाचालकांकडून वेठीस धरण्यात येत आहे.
मुंबईकरांमध्ये संतापाची भावना
बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल होतायत. बेस्ट बस नसल्याने मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बसेसचा आधार घ्यावा लागतो आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. मुंबईत बेस्टच्या संपाचा आज दुसरा दिवस उलटला तरी तोडगा निघालेला नाही. मुंबईकरांचे हाल होत असताना महापालिका आणि बेस्टवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई, 'पोलिसांच्या मदतीने बसेस रस्त्यावर उतरवणार'
बेस्ट संपाचा आज दुसरा दिवस उलटला तरी तोडगा निघालेला नाही. मुंबईकरांचे हाल होत असताना महापालिका आणि बेस्टवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र संप मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोलमोल उत्तर बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिले आहे. तर गेल्या कित्तेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने संप मागे घेणार नसल्याची भूमिका बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी घेतली आहे.
घरे खाली करण्याची नोटीस
बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत कुलाबा वसाहतीत राहणाऱ्या २ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आलीय. परळच्या वसाहतीत वास्तव्याला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात येणार आहे. तर ३०० कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. तर दुसरीकडे जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रण शशांक राव यांनी घेतलीय. त्यामुळे संप आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनानं मात्र चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं आवाहन बेस्ट प्रशासनानं केलंय. तर बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला. बेस्ट कामगार सेनेच्या मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी सामूहिक राजीनामे दिले.
शिवबंधन काढून टाकले, सदस्यांचे राजीनामे
मुंबईतल्या प्रतिक्षा नगरमधील शिवसैनिकांनी आणि बेस्ट कामगार सेनेच्या सदस्यांनी आपल्या मनगटावरचे शिवबंधन काढून टाकले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन नंतर शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने माघार घेतली. मागण्या मान्य पूर्ण होण्यापूर्वीच माघार घेतल्याने बेस्ट कामगार सेनेमध्ये राग होता. त्याचा निषेध म्हणून संघटनेच्या सदस्यांनी आधी राजीनामे दिले. त्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठेचं प्रतिक म्हणून ओळख असलेलं मनगटावरचं शिवबंधनही तोडले आहे.