मुंबई : ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी बेस्टने जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर,चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरायला जाणाऱ्या प्रवांशाच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. ७ मर्यादित, १११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ या बससेवेच्या रात्री १०. ०० वाजल्यापासून एकूण २० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच शामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच, चर्चगेट स्थानक(पूर्व) आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.


तर पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फे-या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार,कल्याण ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल अशा बारा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतादरम्यान प्रवाश्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.