मुंबई : नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी करण्याबाबत आज बेस्ट कृती कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांनी संपाची हाक दिली आहे.  ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा बंद सुरु होणार आहे. त्यामुळे याचा परिमाण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगार संप करणार आहेत. बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर जाणार, असल्याचे बेस्ट कृती कामगार संघटनेच्यावतीने आज जाहीर करण्यात आले आहे. ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा बंद सुरु होईल, अशी माहिती बेस्ट कामगारांच्यावतीने देण्यात आली.


या होत्या प्रमुख मागण्या


नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू करण्यात याव्यात. अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी. महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस मिळावा. तसेच बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी.


ठळक वैशिष्ट्ये


- बेस्ट कृती कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यातील चर्चा निष्फळ
- ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा बंद
- बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगार संप करणार
- ३० हजार कर्मचारी जाणार संपावर
- नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी, महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस मिळावा या देखील संघटनांच्या मागण्या आहेत