मुंबई : तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बेलवली फाटकाजवळ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाकलेला संपूर्ण रूळाचा तुकडा बदलण्यात आल्यानंतर सव्वातीन वाजता रेल्वे सेवा सुरळीत झाली.  


तापमानात प्रचंड वाढ, फटका मध्य रेल्वेला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन तीन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बेलवली फाटकाजवळ उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी२वाजण्याच्या सुमारास विस्कळीत झाली. २ वाजून १५ मिनिटांनी अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकात दरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे रूळ प्रसरण पावल्यामुळे तो वाकल्याचं लक्षात आल्यावर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. 


४८ तासात उष्णतेची लाट येण्याचा इशारा


त्यामुळे वाकलेला संपूर्ण रूळाचा तुकडा बदलण्यात आला. त्यानंतर सव्वातीन वाजता रेल्वे सेवा सुरळीत झाली. ठाणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. रेल्वे वाहतुकीवरही या वाढलेल्या तापमानाचा फटका दिसून आला.