दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात आताच निव़डणुका झाल्या कुणालाही आता पुन्हा निवडणुका नको आहेत. महायुती सरकार स्थापन करेल असं वाटत होतं, पण यात अजूनही काही शक्यता दिसत नाहीय. सर्वांनाच निवडणुका लगेच नको आहेत. भाजपाने सरकार स्थापन केलं नाही, तर इतर कुणी तरी करेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संधी मिळाली तर ही परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही देखील जरूर सरकार स्थापन करू', असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.



सरकार कुणी स्थापन करावं, हे आकड्यांवर ठरतं आमच्याकडे आकडे नाहीत, आणि सरकार आम्ही स्थापन करू हे सांगायला मी काही पक्षप्रमुख देखील नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं असलं, तरी कुणीच सरकार स्थापन करत नसेल आणि निवडणुका तर कुणालाही नको आहेत, अशा वेळेत जर संधी आपल्याला मिळाली तर सरकार जरूर स्थापन करू असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.