गणेश कवडे, मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या वतीने मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation)  9  वार्ड वाढण्यात आले होते . मात्र हा निर्णय सरकार बदलताच बदलण्यात आला आहे. याविषयी विधानसभेत मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक मांडण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर चर्चा करताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी विधेयकाला विरोध करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी कोर्टात प्रकरण असताना आज एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला. काही लोकांना निवडणुकीची भीती वाटत आहे. सरकार घटनाबाह्य आहे, असे बोलत अध्यक्ष यांना प्रश्न उपस्थित करण्यात आले. 


मात्र महाविकसआघाडी सरकार मधील काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि समाजवादीचे रईस शेख यांनी एका पक्षाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. 


नितेश राणे यांनी म्हटलं की, अध्यक्ष महोदय आपण आपल्या विद्यार्थ्याला योग्य वेळी मार्गदर्शन करायला हवे होते. एकतर आपले मार्गदर्शन योग्य नव्हते किंवा विद्यार्थ्याचे लक्ष नव्हते. शिवाजी पार्कवर मी मर्द आहे हे बोलणं सोपं आहे. वॉर्ड कुठे बनवले याचे लोकेशन कळायला हवं होतं. यावर आमदार सुनील प्रभू यांनी महानगरपालिका निवडणुकीला समोर या आम्ही घाबरत नाही. आम्ही कधीही निवडणुकीला सामोरे जाऊ अशा प्रकारे उत्तर दिले. 


सदा सरवणकर यांनी म्हटलं की, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याविषयी मी निर्णयाच्या विरोधात कोर्टात जात होतो. मात्र मला जाण्यासाठी नकार दिला होता. मात्र मुख्यमंत्री यांनी याविषयी चौकशी केली जाईल असे सांगितले आहे . तसेच कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोला ही लगावला.