मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे जवळपास 40 हून अधिक आमदार घेऊन गुवाहटीला पोहोचले आहेत. आपल्याकडे 46 आमदारांचं पाठबळ असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इतर अपक्ष आमदार ही शिंदे गट आणि भाजपकडे वळताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) पाठोपाठ क्षितिज ठाकूर (MLA Kshitij Thakur) हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता आणखी वेग आलाय. अनेक नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीला पोहोचत आहेत.


देवेंद्र फडणवीस हे भाजप आमदार आणि इतर नेत्यांना ही भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संख्याबळ आलं तर भाजप या सर्व आमदारांना घेऊन वेगळ्या ठिकाणी जावू शकतं. देवेंद्र फडणवीस हे देखील सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.


राज्यातील घडामोडी वेगाने घडत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचा आदेश धुडकावत भरत गोगावले यांची शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी नियु्क्ती केली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.