मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने भाजपनेते किरीट सोमय्यांना यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण देण्याचा निर्णय़ घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपनेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतू न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता.


सत्र न्याायालयाच्या निर्णयाला किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांचा जामीन काही अटी शर्थीवर मंजूर केला आहे.


या अटींवर जामीन मंजूर
- अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश


- सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश


-  दुपारी 11 ते 2 दरम्यान पोलीस स्टेशनला हजेरी आवश्यक