Breaking News : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी
Breaking News : घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये लागली आग
Breaking News : घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. आग लागलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. हा रुग्णालयाचा परिसर असल्यामुळं तिथे गर्दी असते. रुग्णालयाच्या खाली असणाऱ्या कँटीनमध्ये आग लागली. या घटनेते एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर तीन जण जखमी झालेत.
पहिल्या मजल्यापासून असणाऱ्या रुग्णालयापर्यंत आग पोहोचली एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठीची धावपळ सुरु झाली. यामध्ये स्थानिकांकडून सर्वप्रथम रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरु केलं. तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये आग लागल्यामुळं या परिसरात एकच खळबळ माजली होती. साधारण 10 ते पंधरा मिनिटांपासून लागलेल्या या आगीनं गंभीर स्वरुप धारण केलं असून, रुग्णालयाच्या इमारतीत आगीचे लोट पसरु लागले. दरम्यान, रुग्णालयाच्या इमारतीत एकूण किती नागरिक होते याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
प्राथमिकतेनं या रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आणि इतर सर्वच रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. रुग्णालयात जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी त्या मार्गाचाही वापर स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, स्थानिकांनी समयसूचकता दाखवत बचावकार्य सुरु केलेलं असतानात अखेर अग्निशमन दल इथं पोहोचलं. सध्या या परिसरातून गर्दी पांगवण्याचं काम पोलीसांनी हाती घेतलं असून, रुग्णांना सुरक्षित स्थळी/ इतर रुग्णालयांमध्ये नेण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. सध्या रुग्णालय परिसरामध्ये रुग्णवाहिकांची गर्दी दिसत असून, सर्व रुग्णांपर्यंत तातडीनं मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पारेख हॉस्पिटलच्या तीन- चामर मजली इमारतीमध्ये रुग्णांसोबतच तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठीसुद्धा स्थानिकांनी मदतीचा हात दिला.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच रुग्णालयामध्ये असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. आपलं माणूस सुरक्षित आहे का, हाच एक केविलवाणा प्रश्न इथं आलेला प्रत्येकजण विचारत होता. घाटकोपरमध्ये लागलेल्या या आगीनंतर आता या इमारतीचं फायर ऑडीट झालं की नाही, अग्नी प्रतिबंधक यंत्रणा इथं सक्रिय होती की नाही असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, साधारण पाऊण तासांनंतर आग नियंत्रणात मिळवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आणि अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.