गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तोबा गर्दी, कोरोनाला निमंत्रण?
Ganeshotsav : एकीकडे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे.
मुंबई : Ganeshotsav : एकीकडे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे. दादर बाजारात ( Dadar market) खरेदीसाठी कमालीची गर्दी दिसून येत आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन करूनही मार्केटमध्ये झुंबड दिसून येत आहे. दादर मार्केट, फुलमार्केटमध्ये चालायलाही जागा नाही, अशी परिस्थिती तेथे पाहायला मिळत आहे. (Big crowd in Mumbai on the backdrop of Ganpati Festival)
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. मात्र साधेपणाने उत्सव साजरा करण्याचं आवाहन करूनही शहरांमध्ये बाजारपेठात प्रचंड गर्दी आहे. खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी होत आहे. (Huge crowd seen at Dadar market ahead of Ganeshotsav) अशी स्थिती मुंबईत दादरच्या फुलमार्केटमध्येही आहे. फुलमार्केटमध्ये एवढी प्रचंड गर्दी झाली की इथे चालायलाही जागा नाही. फुलं खरेदीसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे.
अनेक लोक मास्क न घालता गर्दी करत आहेत. मुंबईत दादरच्या मार्केटमध्ये, फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मुंबईत माटुंगा, वांद्रे, सँडहर्स्ट रोड, चेंबूरमध्ये रूग्णवाढ वेगात होत आहे. रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मनपासमोर आव्हान आहे. असे असताना होणारी गर्दी चिंतेत भर टाकत आहे. दरम्यान, पुण्यात गणेशोत्सवादरम्यान 10 ते 19 सप्टेंबर या कालावधी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.