मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे याने आपल्या कुटुंबासह अंगावर रॉकेल ओतून घेत मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्हयातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्यात आले. ज्याची किमंत 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी केवळ 14 लाख रुपये देण्यात आले आहेत. 


उर्वरित रक्कम मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली असा आरोप हुनगुंडे यांनी केला आहे. याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. परंतु, अजूनही हे काम झाले नाही त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे त्या शेतकऱ्याचे म्हणणं आहे.