Earthquake in Palghar : आताची सर्वात मोठी बातमी...पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हादरलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. नाशिक शहराच्या पश्चिमेला 89 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जातंय. 


पालघर जिल्हा पहाटे हादरला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे साधारणपणे चार वाजण्याच्या सुमाराला पालघर जिल्ह्यातल्या तलासरी, डहाणूजवळ हे धक्के बसले. भूकंपाचं केंद्र जमिनीखाली 5 किमी खोल आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 एवढी मोजण्यात आलीय.  


या भागात जाणवला भूकंप


भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा पडझड झाल्याची माहिती नाही. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, आंबोली, धानिवरी, तलासरी, बोर्डी, घोलवड, कासा या गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, डहाणू परिसरात 11 नोव्हेंबर 2018 रोजी पहिला भूकंप जाणवला. जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 पासून विशेषतः तलासरी तालुक्यातील दुंदलवाडी गाव आणि डहाणू तालुक्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के अनेकदा जाणवले आहेत.