मुंबई : कोरोनामुळे MPSCविद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली आहे. त्यांच्या परिक्षेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. असं असताना MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती येत आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व MPSC विग्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.  कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यसरकार दिलासा देणार आहे.  येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


MPSC परिक्षेबाबत अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. ' दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या.  त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती.  याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती  राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे दत्ता भरणे यांनी दिली आहे.