मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आताची मोठी बातमी समोर येतेय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांच्या वडीलांना शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून (Shivadi Court) फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये (Mulund Police Station) दाखल केलेलं प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं आहे. कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची  पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार नवनीत राणांवर कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असा सवाल कोर्टाने विचारला होता. नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला होता. 


काय आहे प्रकरण?
नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे वडिल  हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 
खासदार नवनीत राणा यांनी 2013 मध्ये  आमदार रवी राणा यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. या प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेमुळे कोर्टाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय दिला. दरम्यानच्या काळात नवनीत राणा यांनी या जात प्रमाणपत्राच्या आधारे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणूकीत नवनीत राणा यांनी विजय मिळवत आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.