Uddhav Thackeray camp : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मोठा दिलासा मिळाला आहे.  'मशाल' चिन्हावर ( Mashal) दावा करणारी समता पार्टीची याचिका दिल्ली उच्च न्यायलयाने फेटाळली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला  'मशाल' चिन्ह दिले होते. याच्याविरोधात समता पार्टीने दाखल केलेली याचिका न्यायालयाने आज फेटाळून लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले होते. तसेच खरी शिवसेना कुणाची यावरुन सर्वोच्च न्यालायत सुरु आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नाही. मात्र, अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटाला निडवणूक चिन्ह वाटप केले. यावर आक्षेप घेण्यात आला. 


दरम्यान, निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला तात्पुरते नवे चिन्ह आणि नाव दिले होते. त्यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले होते. मात्र हे "मशाल" चिन्ह आपले असल्याचा दावा करत समता पार्टीने केला. याविरोधात त्यांननी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्यावेळी समता पार्टीच्या याचिका फेटाळून लावली आहे. तसेच मशाल चिन्हावरील समता पार्टीचा दावा अयोग्य असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहणार आहे.