मुंबई : शेतकऱ्यांना (Farmers) नेहमीच कोणत्या न कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी बळीराजावर वरुण राजाचा कोप होतो. पाऊस हवा असतो तेव्हा बरसत नाही. जेव्हा पीक हातातोंडाशी आलेलं असतं तेव्हा अवकाळी होते आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. अस्मानी आणि सुल्तानी संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेलेच. शेतकऱ्यांना क्वचितच आनंदाची किंवा दिलासादायक बातमी मिळते. त्यापैकी ही दिलासादायक बातमी आहे. (big relief to vidarbha and marathwada farmer there will be no unseasonal rain the weather department forecast) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विदर्भ-मराठवाड्यात (Vidarbha) अवकाळी होणार असल्याचा (Marathwada) अंदाज काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र  हे अवकाळी पाऊसाचं संकट (Maharashtra Unseasonal Rain) तूर्तास टळलं आहे. आठवडाभर पाऊस होणार नसल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.