मुंबई : Mumbai Blast : भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ( 1993 Mumbai serial blasts case) सहभागी असलेल्या अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे.


1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 1993 मध्ये मोठे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या साखळी बॉम्बस्फोटात हात असलेल्या अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळू शकणार आहे.


या स्फोटात मुंबईत अनेक ठिकाणी एकूण 12 बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे 257 लोकांचा मृत्यू झाला असून 713 लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता अटक करण्यात आलेल्या दहशतवादी अबू बकरला यूएईमधून भारतात आणण्यात येणार आहे.


RDXच्या उतरविण्यात मोठी भूमिका


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव अबू बकर असून तो पीओकेमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त मोठ्या स्फोटांमध्ये वापरले जाणारे आरडीएक्स उतरविण्यात सहभागी होता. तो संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि पाकिस्तानमध्ये राहत होता. भारतीय एजन्सीच्या माहितीवरुन त्याला नुकतेच यूएईमध्ये पकडण्यात आले.


29 वर्षांपासून भारताला चकवा


देशाच्या एजन्सीच्या मोस्ट वाँटेड यादीत अबू बकर याचा बराच काळ समावेश होता. याआधी 2019 मध्ये देखील अबू बकरला पकडण्यात आले होते, परंतु काही कागदपत्रांमुळे त्याला यूएईच्या अधिकाऱ्यांनी सोडले होते. उच्च सूत्रांनी पुष्टी केली आहे की, भारतीय एजन्सी अबू बकरच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत आहेत, जो बऱ्याच काळापासून देशाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. जवळपास 29 वर्षांनी UAE मधून परत आणल्यानंतर वॉन्टेड बकरला भारतात कायद्याचा सामना करावा लागणार आहे.