भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटक कारवाईबाबत मोठी अपडेट
Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे अटकेच्या भीतीने अज्ञातस्थळी आहेत.
मुंबई : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे अटकेच्या भीतीने अज्ञातस्थळी आहेत. त्यांची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. (Big update on the arrest of BJP MLA Nitesh Rane)
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.
नॉट रिचेबल आमदार नितेश राणे फेसबूकवर अॅक्टीव्ह
गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस शोधत आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. मात्र, ते पोलिसांपुढे आलेले नाहीत.
दरम्यान, त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली. आता राज्य सरकारकडून त्यांना सुनावणीदरम्यान, अटक करणार नाही, अशी ग्वाही उच्च न्यायालयात दिली आहे.