मुंबई :  नालासोपार्‍यात काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. दुचाकीने अचानक पेट घेतल्याने भर रस्त्यात अग्नितांडव पाहिला मिळालं. धक्कादायक म्हणजे या आगीत चार जण होरपळे असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
नालासोपारा पश्चिमेच्या सिविक सेंटर समोर एका दुचाकीला अचानक आग लागली होती. दुचाकी स्वाराने रस्त्यात उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरच्या पाईपने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला काही जणांनी दुचाकीच्य पेट्रोल टाकीचं झाकण उघडून त्यावर पाणी टाकण्याचा सल्ला दिला. 


दुचाकी स्वाराने पेट्रोल टाकीचं झाकण उघडून पाणी टाकलं, पण त्याचवेळी पेट्रोलचा मोठा भडका उडाला आणि आगीचे लोळ उठले. दुचाकीच्या मागे उभी असलेली रिक्षाही आगीच्या ज्वाळात सापडली. या आगीत दुचाकी आणि रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. 



दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकासह दोन प्रवासीही यात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


दुचाकीला आग लागण्याचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.