मुंबईच्या वेशीवर पुन्हा संकट, राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

300 हून अधिक कोंबड्या, बदकं दगावली. 15 हजारांहून अधिक कोंबड्यांना मारण्याची तयारी सुरू
मुंबई : कोरोना नियंत्रणात आला असताना आता नवं संकट राज्यावर कोसळलं आहे. शहापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. 300 हून अधिक देशी कोंबड्या आणि बदकं दगावली आहेत. तर 15 हजारांहून अधिक कोंबड्यांना मारण्याची तयारी सुरू आहे. (Bird Flu confirmed in Maharashtra Shahapur, 300 Birds die ) कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू झाल्यामुळे तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली.
ठाण्यातील शहापूरच्या वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील 300 हून अधिक कोंबड्या दगावल्याय आहेत. यामुळे सर्तक झालेल्या पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय घेतला आहे.
एक किलोमीटर परिघातील किमान 15 हजारांहून अधिक पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बर्ड फ्लूच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी चिकन आणि अंडी खाणा-यांनी काय काळजी घ्यावी...