मुंबई : वैद्यकीय क्षेत्रातलं एक अग्रणी नाव म्हणजे डॉ. नीळकंठ तळवलकर (एन.जी. तळवलकर). मुंबईतील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. नीळकंठ तळवलकर यांच्या  जन्मशताब्दीनिमित्त आज त्यांना वैद्यकीय क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या योगदानाने ठसा उमटवणाऱ्या डॉ. तळवलकर यांच्या अनेक आठवणी मान्यवरांनी जागवल्या.


तळवलकर कुटुंब हे वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. तळवलकरांच्या सलग सात पिढ्या अगदी आजही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबईतील सुप्रसिद्ध डॉ. नीळकंठ तळवलकर रहेजा हॉस्पिटलचे प्रमुख प्रवर्तक देखील होते. एन. जी. तळवलकर यांचा जन्म दि. ५ ऑगस्ट, १९१८ रोजी झाला होता. आज ५ ऑगस्ट २०१८ डॉ. तळवलकर यांची जन्मशताब्दी आहे.