मुंबई : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Political Reservation) भाजप (BJP) आक्रमक झालीय. योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या नेतृत्त्वात मंत्रालयावर भाजपचा मोर्चा काढला. पण त्याआधीच पोलिसांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते, आंदोलक राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसी राजकीय आरक्षण जाण्याला मविआ सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात यावेळी भाजपने केला. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे भाजपच्या ओबीसी मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिलाय...


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आंदोलकांनी राज्यसरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. ओबीसी राजकीय आरक्षण जाण्याला मविआ सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय.


दरम्यान, मध्य प्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं असं वक्तव्य सुप्रीया सुळेंनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. घरी जा, स्वयंपाक करा असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मसणात जा, दिल्लीत जा कुठेही जा पण आरक्षण द्या असं चंद्रकात पाटील म्हणाले.