मुंबई : प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना तातडीने मुंबईत येण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारले आहे. राज्यात घडामोडी यानंतर भाजपा आमदार मुंबईत राहणे गरजेचे यासाठी बोलवण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल यांनी अधिवेशन बोलवणे सारख्या काही निर्णय घेतले तर खबरदारी म्हणून भाजपा आमदार बोलवण्यात आले आहे. तिकडे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदार महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. याचाच अर्थ शिंदे आजच महाविकास आघाडीवर प्रहार करून सरकारमधून बाहेर पडू शकतात.


शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये समन्वयाची जबाबदारी भाजपचे संजय कुटे, मोहित कंभोज, रविद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची माहिती राज्यपालांना देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलंय. हा गटच शिवसेनेचा असल्याचं सांगून राज्यात मोठा राजकीय भूंकप घडण्याची तयारी आहे.