कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेना-भाजपचे (Shiv Sena Bjp) कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. यावेळेस कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याचं कारण म्हणजे श्रेयवाद. मुंबई उपनगरातील उड्डानपूलाच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. त्यामुळे लोकार्पण यापूर्वीच या कार्यक्रमाला श्रेयवादाचे ग्रहण लागलंय. (bjp and shiv sena followers controversy over to credit from borivali kora kendra flyover bridge inauguration)


नक्की प्रकरण काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरीवली पश्चिमेला कोरा केंद्र उड्डाणपूल बांधण्यात आलं आहे. या उड्डाणपूलाचं लोकार्पण उपनगर पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते थोड्यात वेळात होणार आहे. मात्र या भागात भाजपाकडून खासदार गोपाळ शेट्टी यांचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले आहे. तर भाजच्या याच बॅनरबाजीला शिवसेनेने देखील बॅनरबाजीने उत्तर देण्यात आलं.


याच वेळेस दोन्ही पक्षाचे आक्रमक झालेले कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून या परिसरात बॅनरबाजी आणि झेंडे लावण्यात आले आहे.


मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचं स्पष्ट झालंय.