कोस्टल रोडच्या भूमिपूजनावर भाजपचा बहिष्कार
शिवसेना-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई
मुंबई : कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलल्याबद्दल भाजपमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पावरून शिवसेना-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. मात्र महापालिका भाजप गटनेते मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष अतुल शाह, स्थानिक नगरसेविका सरिता पाटील आणि स्थानिक भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांची निमंत्रण पत्रिकेत नावं आहेत.