मुंबई : BJP corporator Agitation : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीच्यावेळी भाजपकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला. मुंबई महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानं भाजपनं स्थायी समिती सभागृहात घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच  कुठल्या प्रकारची चर्चा न करता शेवटच्या दिवशी प्रस्ताव मंजूर केल्याने 6 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. यावेळी भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात जोरदार गोंधळ घालण्यात आला. भाजपने ठिय्या केला. यावेळी कागदी फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. (BJP corporators riots in BMC standing committee hall, accuses Shiv Sena of corruption)  



मुंबई महापालिकेची आज मुदत संपताना आज शेवटची स्थायी समितीची बैठक पार पडली. पालिकेच्या शेवटच्या स्थायी समितीत जवळपास 360 प्रस्ताव मांडण्यात आले. त्यातील बहुतांश प्रस्ताव हे मंजूर करण्यात आले आहेत. भाजप नगरसेवकांकडून स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करत असताना हरकतीचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र भाजप नगरसेवकांचे म्हणणे कोणीही ऐकून न घेतल्याने भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घालायला सुरुवात केली.



यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे सर्व प्रस्ताव मंजूर करून तीनशे सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचं भाजपने आरोप केला आहे. याविरोधात भाजपकडून मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालय बाहेरसुद्धा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. पालिकेचा सचिन वाझे यशवंत जाधव आहेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा घोषणा भाजप नगरसेवकांकडून यावेळी देण्यात आल्यात.