मुंबई: युतीमध्ये चर्चेची कोंडी भाजपमुळे निर्माण झाली. आता ही कोंडी भाजपनेच फोडावी, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. कालच मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी आमची दारे चर्चेसाठी २४ तास उघडी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेने नवा प्रस्ताव घेऊन चर्चेला यावे, असे भाजपचे म्हणणे आहे. परंतु, चर्चेची कोंडी तुम्ही निर्माण केली, आता तुम्हीच ती फोडा, असे सांगत संजय राऊत यांनी चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं.... राऊतांचे आणखी एक ट्विट


शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रात निकालाला १३ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगितले. मात्र, भाजपकडे बहुमत असल्यास त्यांनी जरूर सरकार स्थापन करावे. सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी प्रथम मिळायला हवी. किंबहुना ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे भाजपने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला तर शिवसेना काहीही करणार नाही. यानंतर सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठीही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असेही राऊत यांनी सांगितले. 


'संजय...' सिर्फ नाम ही काफी है!


शिवसेना आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार ही अफवा


आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक संपल्यानंतर सर्व ५६ आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. जेणेकरून भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न झाल्यास त्यांना शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधता येणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, राऊतांनी हा दावा फेटाळून लावला आहे. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही. आजच्या बैठकीनंतर हे आमदार पुन्हा आपापल्या मतदारसंघात रवाना होतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.