मुंबई : शिवसेना-भाजप एकत्र लढली तर काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करणार आहोत अशी भूमिका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मांडली. तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिल्यानंतरच आरक्षणाचा विषय संपणार असून, मागासवर्ग आयोग जसा अहवाल देईल तो स्वीकारला जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत शुक्रवारी कोर्टाने सरकारला होत असलेल्या विलंबाबद्धल विचारलं होतं. तसंच मागासवर्ग आयोगालाही अहवाल देण्यास उशीर का होत आहे याचीही कोर्टानं विचारणा केली होती. 


पाहा काय बोलले चंद्रकांत पाटील