किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा पाच महिलांचा आरोप... संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा पाच महिलांनी आरोप केलाय असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर किरीट सोमय्या यांनी राऊत केवळ आरोप करतात पुरावा देत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) समोर यावं असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलंय. भाजप नेते किरिट सोमय्यांविरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला पुढे आल्यात. किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा आरोप या महिला करत असल्याचा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केलाय. मात्र आम्ही राजकाऱण कुटुंबापर्यंत नेत नाही अशा शब्दांत राऊतांनी सोमय्यांना इशारा दिलाय. तर संजय राऊत यांनी 37 आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही असा पलटवार किरीट सोमय्या यांनी केलाय.
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय. या नेत्यांची नावं घेण्याची हिम्मत ईडी आणि किरोट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय.. घोटाळा केलाच तर हिशेब तर द्यावाच लागणार असा पलटवार किरीट सोमय्यांनी केलाय.
दरम्यान, संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत (Sandeep Raut) हे चौकशीसाठी ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात हजर झालेत. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी (Khichadi Scam) त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. कोविड काळात कोणत्याही प्रकारची कागदपत्रं तयार केली जात नव्हती. राजीव साळुंखे माझ्याकडे आले त्यांनी किचन देण्याची विनंती केली. पैसे घेत नव्हतो तरी त्यांनी बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवले असं संदीप राऊत म्हणालेत.
कोविड काळात कोणतीही कागदपत्र केली जात नव्हती, माझ्याकडे आधीपासून किचन होतं, त्याठिकाणी साठा उपलब्ध होता. त्यावेळी राजीव साळुंखे माझ्याकडे आले आणि त्यांनी किचन देण्याची विनंती केली. त्याच्याकडून मी पैसे मागितले नव्हते मात्र त्यांनी माझे सर्व सामान वापरल्यामुळे हे पैसे पाठवले होते असं स्पष्टीकरण संदीप राऊ यांनी दिलंय.
किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी
दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. पहिल्यांदा चौकशी झाली तीच कागदपत्रं दुसऱ्यांदाही मागितली आहेत. ती देणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्या आहेत. महापौर म्हणून कुणावरही दबाव टाकला नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट करत आता तर महापौर नाही, नगरसेवक नाही मग कुणाच्या दबावाखाली काम सुरू आहे असा सवाल त्यांनी केलाय. जे गेले त्यांचा हिशेब कुठे आहे. जे राहिलेत त्यांच्याकडे हिशेब मागितला जातोय. आम्ही हिशेब देऊ असंही त्या म्हणाल्या. कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होतेय.